Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)
[ad_1]
नकारात्मक भावनांचे साखळदंड तोडा आणि तुम्ही ज्यास पात्र आहात त्या भावनिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या.
राग, खेद व पश्चात्तापाच्या भावनांशी तुम्ही झगडत आहात का? आपण भावनिकदृष्ट्या थकलो आहोत, ताणात आहोत आणि वेदनादायी स्मृतींनी निराश झालोय असं तुम्हाला वाटतं का? आपल्याला दयनीय बनवणार्या गोष्टींना तुम्ही धरून ठेवलंय का?
असं असेल तर, ‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’ हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.
‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’मध्ये तुम्हाला पुढील गोष्टींवर विवेचन केलेलं दिसेल:
लोक धरून ठेवत असणार्या 20 सर्वसामान्य बाबी. (ज्याचा परिणाम दयनीय असतो.)
नकारात्मक विचार व भावनांना सोडून देणं इतकं कठीण का आहे?
आपल्या आतल्या टीकाकाराला आपला गैरफायदा घेऊ न देता कसे नियंत्रणात ठेवाल?
सोडून देता येण्याची सगळ्यात सोपी व प्रभावी तंत्रं. (जी तुम्ही लगेचच वापरू शकता.)
From the Publisher
नकारात्मक भावनांचे साखळदंड तोडा आणि तुम्ही ज्यास पात्र आहात त्या भावनिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या.
राग, खेद व पश्चात्तापाच्या भावनांशी तुम्ही झगडत आहात का? आपण भावनिकदृष्ट्या थकलो आहोत, ताणात आहोत आणि वेदनादायी स्मृतींनी निराश झालोय असं तुम्हाला वाटतं का? आपल्याला दयनीय बनवणार्या गोष्टींना तुम्ही धरून ठेवलंय का?
असं असेल तर, ‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’ हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.
‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’मध्ये तुम्हाला पुढील गोष्टींवर विवेचन केलेलं दिसेल:
लोक धरून ठेवत असणार्या 20 सर्वसामान्य बाबी. (ज्याचा परिणाम दयनीय असतो.)
नकारात्मक विचार व भावनांना सोडून देणं इतकं कठीण का आहे?
आपल्या आतल्या टीकाकाराला आपला गैरफायदा घेऊ न देता कसे नियंत्रणात ठेवाल?
सोडून देता येण्याची सगळ्यात सोपी व प्रभावी तंत्रं. (जी तुम्ही लगेचच वापरू शकता.)
बहुतेकजण नकारात्मक विचार व भावनांच्या आवर्तात असतात. यापैकी काही विचार व भावना वेदनादायी स्मृतींतून उद्भवलेल्या असतात. यामागे, खोलवर जाणवणारी व्यक्तिगत हानीची जाणीव असते. तर काही विचार व भावना म्हणजे चुकीच्या अपेक्षा व उद्ध्वस्त स्वप्नं यांची परिणती असते. दररोज आपल्याला तडाखे देणारे ताणतणाव व समस्या यामुळे निर्माण होणार्या संताप, नाराजी नैराश्य यातून काही विचार व भावना जन्म घेतात.
नकारात्मक विचार व भावना आपल्यासाठी मानसिक अडथळे बनतात, ते आपला दृष्टिकोन बिघडवतात, निर्मितीक्षमतेसाठी बाधक ठरतात आणि अंतिमत: आपल्या आयुष्याची गुणवत्ता ढासळवतात.
एकदा का आपण उदास, पराभूत मनोवृत्तीतून बाहेर आलो की, ती आपल्याला पुन्हा मागे ओढू शकत नाही. अशी वृत्ती आपण एकदा का सोडून दिली की ज्या गोष्टी आपल्यासाठी खरोखर महत्त्वाच्या आहेत; त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास आपण मोकळे होतो.
पण आपण‘सोडून द्यायचे’ म्हणजे नेमके काय करायचे?
बरेचदा‘सोडून देणे’ ही गोष्ट अतिसोपी, कुचकामी ‘कॅचफ्रेज’ म्हणून मांडली जाते – जी ताणतणावविरहित आयुष्य मजेत जगण्याच पुरस्कार करते. त्याचा उपयोग होत नाही. हे एखाद्या तणावग्रस्त माणसाला‘काळजी करणे बंद कर’ असे सांगण्यासारखे असते.
या पुस्तकात आपण ‘सोडून कसे द्यायचे’ हे शिकण्यासाठी आखलेली पद्धत पायरी पायरीने सोबत मिळून शिकणार आहोत. न गुंतण्याची मनोवृत्ती कशी आत्मसात करायची ते तुम्ही या पद्धतीत शिकाल. बरेचदा‘न गुंतणे’ याचा अर्थ ऐहिक बाबींचा त्याग असा लावला जातो; पण मुद्दा तो नाही. त्याऐवजी, आपण ‘न गुंतणे’ याचाच पाठपुरावा करू, कारण त्याचा संबंध आपल्या मनातील तक्रारी, कडवटपणा आणि आपल्या मनात बिनभाड्याने वास्तव्य करणार्या इतर मानसिक ओझ्यांशी असतो. त्यासाठी मला वर्षानुवर्षं ज्यांचा उपयोग झाला आहे अशी काही तंत्रे व रणनीती मी तुम्हाला सांगणार आहे. या प्रत्येक तंत्रासोबत एक सोपा स्वाध्याय आहे. हे तंत्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्ही तो वापरू शकाल.
दुसरा महत्त्वाचा प्रश्न : नकारात्मक विचार व भावना कशा ओळखायच्या?
या पुस्तकात आपण ही समस्याही सोडवू. तुम्ही नकारात्मक विचार व भावनांना कवटाळून बसला आहात का, हे तुम्ही ओळखायला शिकाल. असे विचार व भावना तुमच्या मनात, वृत्तीत व जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात खोलवर रुतून बसल्या असल्या, तरी त्या तुम्ही ताबडतोब शोधून काढू शकाल. एकदा का तुम्हाला त्या शोधता आल्या की, तुम्ही या पुस्तकात सांगितलेल्या तंत्रांच्या मदतीने त्यापासून सुटका करून घेऊ शकाल.
पश्चात्ताप हा आयुष्यातील अटळ भाग असतो. आपण चुका करतो, सुमार निर्णय घेतो. त्यामुळे आपल्याला आनुषंगिक जबरदस्त तोटे होतात. त्यातील बरेचसे आले असते असे आपल्याला वाटत असते.
पण पश्चात्ताप निरुपयोगी नसतो. त्याचा फायदा होतो. तो आपल्याला धडे शिकवतो. आपण पुन्हा त्याच चुका करू नयेत व सुमार निर्णय घेऊ नयेत यासाठी हा पश्चात्ताप आपल्याला मदत करतो. पण जर आपण पश्चात्ताप मनात भिनू दिला, भूतकाळात आपल्या हातून घडलेल्या चुका व आपले निर्णय ‘जगत’ राहिलो, तर तो भावनिक अडसर बनतो. अखेर, आपल्या मनात एक चुकीची ‘कहाणी’ तयार होते. ती आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते की आपण ‘चांगले’ निर्णय घेण्यास असमर्थ आहोत आणि त्यामुळे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळण्यास अपात्र आहोत.
मग आपल्याला गाळात रुतून बसल्यासारखे वाटते… निराश, उद्विग्न तणावग्रस्त. आणि सगळ्यात वाईट आपली ही दुर्दशा ही सर्वस्वी आपलीच चूक आहे असे आपल्याला वाटू लागते. त्याचबरोबर आपल्यात सकारात्मक बदल घडवण्याची कुवत नाही असेही वाटू लागते. आपण अत्यंत दुर्बल आहोत अशी भावना घेरून येते.
आपण या भावना दूर सारू शकतो, स्वत:मध्ये सुधारणा घडवू शकतो आणि अखेर, अनावश्यक भावनिक अपराधीपण व आत्मनिंदा यापासून मुक्त आपल्याला ज्या गोष्टीत रस आहे त्या गोष्टींचा व आपल्या इच्छा-आकांक्षांचा पाठपुरावा करू शकतो. तसेच, आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडू शकतील या अपेक्षेने आपण पुढे वाटचाल करू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ती फलनिष्पत्ती बर्याच प्रमाणात आपल्याच हातात असते.
प्रस्तुत पुस्तकाच्या मदतीने तुम्ही एखादी गोष्ट सोडून देण्याची कधी गरज आहे, तुम्ही ते ताबडतोब करायला हवे हे तुम्ही ओळखायला शिकाल आणि ते करण्याचे बक्षीसही अनुभवाल.
डेमन झहारियाज
आपली निर्मितीक्षमता कशी वाढवावी, वेळेचे नियोजन कसे करावे आणि या प्रवासात तुम्हाला अधिक सुखकारक व आनंददायी जीवनशैली कशी निर्माण करावी हे अॅमेझॉनचे बेस्ट सेलिंग लेखक डेमन झहारियाज तुम्हाला टप्प्याटप्प्याने आणि कृतिप्रवण सल्ला देऊन शिकवतील. त्यांची मार्गदर्शनपर पुस्तकं वेगवान मांडणी आणि तत्काळ उपयोगात आणता येतील असे कृतिशील सल्ले यासाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या पुस्तकातून वाचकांना अधिक चांगल्या, सकारात्मक जीवनशैलीचा आनंद मिळाला आहे.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (13 March 2023); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 168 pages
ISBN-10 : 9352203836
ISBN-13 : 978-9352203833
Item Weight : 190 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book
[ad_2]